भारत सरकार शिष्यवृत्ती योजना: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. पैशाअभावी विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो व त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विविध शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतःला उपयुक्त अशा शिष्यवृत्ती च्या सहाय्याने शिक्षण पूर्ण करू शकतील जेणेकरून कोणी विद्यार्थी पैशाअभावी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही.
योजनेअंतर्गत नवबौध्द / अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत दरमहा आर्थिक सहाय्य केले जाते.
| विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
| शिष्यवृत्ती | महाराष्ट्र शिष्यवृत्ती योजना |
| लाभार्थी | राज्यातील विद्यार्थी |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
भारत सरकार शिष्यवृत्ती योजना चे उद्दिष्ट
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- विद्यार्थ्यांची शिक्षण गळती कमी करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करून त्यांना प्रोत्साहित करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढविणे.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.

योजनेचे वैशिष्ट्य:
- भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी सुरु करण्यात आलेली शिष्यवृत्ती योजना आहे.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील नवबौध्द / अनुसूचित जातीतील विद्यार्थी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा लाभ:
प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट 1, गट 2, गट 3, गट 4, या प्रमाणे प्रति महिना (अधिकतम 10 महिने) देखभाल भत्ता दिला जातो.
डे स्कॉलर : (दरमहा रुपयांमध्ये)
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 550/- रुपये |
| गट 2 | 530/- रुपये |
| गट 3 | 300/- रुपये |
| गट 4 | 230/- रुपये |
होस्टेलर : (दरमहा रुपयांमध्ये)
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 1200/- रुपये |
| गट 2 | 820/- रुपये |
| गट 3 | 570/- रुपये |
| गट 4 | 380/- रुपये |
दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे
अपंगत्वाचे प्रकार: अंधत्व / कमी दृष्टी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 150/- रुपये |
| गट 2 | 150/- रुपये |
| गट 3 | 100/- रुपये |
| गट 4 | 100/- रुपये |
अपंगत्वाचा प्रकार: कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 2 | 100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता |
| गट 3 | 100/- रुपये (वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
| गट 4 | 100/- रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता) |
कर्णबधीर सर्व गटांसाठी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 2 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 3 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 4 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 2 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 3 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 4 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 2 | 100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता |
| गट 3 | 100/- रुपये (वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
| गट 4 | 150/- रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता) |
ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी
| गट | दरमहा रुपयांमध्ये |
| गट 1 | 100/- रुपये वाहतूक भत्ता (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
| गट 2 | 100/- रुपये एस्कॉर्ट भत्ता |
| गट 3 | 100/- रुपये (वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता) |
| गट 4 | 150/- रुपये (अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता) |
विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
योजनेच्या अटी:
- विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
- फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
- केवळ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेअंतर्गत लाभ देय आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
- अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील. एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
- महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारत सरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
- फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी या शिष्यवृत्ती अंतर्गत लाभ दिला जाईल.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा रहिवाशी दाखला
- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांनी दिलेला)
- अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
- वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)
- डोमेसाइल प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE) |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
शिष्यवृत्ती योजना
हेल्पलाईन
| हेल्पलाईन नंबर | 022-49150800 |
| मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री) | 1800 120 8040 |
| Helpline Number | 022-49150800 |
| CM Helpline Number (Toll Free) | 1800 120 8040 |
| Mahadbt Scholarship Home Page | Click Here |
सारांश
आम्ही भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. [भारत सरकार शिष्यवृत्ती योजना]