Maha DBT Post Matric Scholarship: एक महत्वपूर्ण अशी शिष्यवृत्ती आहे. अपंग व्यक्तींचे जीवन हे दुसऱ्यांवर अवलंबून असते तसेच त्यांच्याजवळ मिळकतीचे कोणत्याच प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे अशा व्यक्तींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे अपंग व्यक्तिंना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने सदर योजना सुरु केली आहे.
या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
| विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
| शिष्यवृत्ती | अपंग व्यक्तींसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती |
| लाभ | प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत देखभाल भत्ता प्रदान केला जातो. |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Maha DBT Post Matric Scholarship चा मुख्य उद्देश:
- अपंग व्यक्तींना शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे जेणेकरून कुठल्याच आर्थिक अडचणी शिवाय ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे तसेच त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे.

योजनेचे वैशिष्ट्य:
- अपंग व्यक्तींना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी हि योजना आहे.
- अपंग व्यक्ती घरी बसून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने या शिष्यवृत्ती साठी अर्ज करून लाभ मिळवू शकतो त्यामुळे त्याला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती:
- राज्यातील अपंग व्यक्ती सदर योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेत शिक्षण घेणारे परंतु महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे आणि संस्थेच्या बाहेर सर्व करण्याची परवानगी नसलेले विद्यार्थि पात्र असतील. (जसे की, छात्रवृत्ती लागू असलेली इंटर्नशिप किंवा हाऊसमनशिप)
- कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम खंडित करून इतर व्यावसायिक अभ्यासक्रम, तांत्रिक शिक्षण प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला असेल तर असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील.
- शासकीय वसतिगृहात राहणारा आणि पुस्तके आणि स्टेशनरी न मिळणारा विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- या शिष्यवृत्ती च्या सहाय्याने अपंग व्यक्ती स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
- अपंग व्यक्तींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची देखील गरज भासणार नाही.
- या शिष्यवृत्ती च्या सहाय्याने अपंग व्यक्ती स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील.
maha dbt post matric scholarship Amount:
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत गट अ, गट ब, गट क, गट ड, गट इ प्रति महिना (अधिकतम 10 महिने) याप्रमाणे खालील प्रमाणे देखभाल भत्ता प्रदान केला जातो.
डे स्कॉलर
| गट | दरमहा रुपयांमध्ये | 10 महिन्यात |
| गट अ | 550/- रुपये | 5,500/- रुपये |
| गट ब | 530/- रुपये | 5,300/- रुपये |
| गट क | 530/- रुपये | 530/- रुपये |
| गट ड | 300/- रुपये | 3,000/- रुपये |
| गट इ | 230/- रुपये | 2,300/- रुपये |
होस्टेलर
| गट | दरमहा रुपयांमध्ये | 10 महिन्यात |
| गट अ | 1200/- रुपये | 12,000/- रुपये |
| गट ब | 820/- रुपये | 8,200/- रुपये |
| गट क | 820/- रुपये | 8,200/- रुपये |
| गट ड | 570/- रुपये | 5,700/- रुपये |
| गट इ | 380/- रुपये | 3,800/- रुपये |
अंध : वाचक भत्ता (अतिरिक्त)
| गट | दरमहा रुपयांमध्ये | 10 महिन्यात |
| गट अ | 100/- रुपये | 1,000/- रुपये |
| गट ब | 100/- रुपये | 1,000/- रुपये |
| गट क | 100/- रुपये | 1,000/- रुपये |
| गट ड | 75/- रुपये | 750/- रुपये |
| गट इ | 50/- रुपये | 500/- रुपये |
- देखभाल भत्त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे ते या योजनेत समाविष्ट केले गेले आहे.
- व्यावसायिक किंवा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा करण्यासाठी अतिरिक्त 500/- रुपये किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते. (अभ्यास दौरा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग असणे आवश्यक आहे.)
- जर प्रकल्प अभ्यासक्रमासाठी अनिवार्य असेल तर छपाई आणि टायपिंगसाठी उमेदवारास अतिरिक्त 600/- रुपये किंवा दरवर्षी लागू शुल्क प्रदान करण्यात येते, परंतु त्यासाठी प्राचार्य प्रमाणपत्र अनिवार्य असेल.
- एम. फील आणि पीएचडी अभ्यासक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण गट अ, गट ब, गट क नुसार देखभाल भत्ता प्रदान करण्यात येईल.
- महिन्याच्या 20 तारखेपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या महिन्याचा देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील.
- दूरस्थ शिक्षण पद्धतीने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेमार्फत ना परतावा शुल्क भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि साहित्य खरेदीसाठी वार्षिक 500/- रुपये देण्यात येतात.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार व्यक्ती अपंग असणे आवश्यक आहे.
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील अपंग व्यक्तींच या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्याबाहेरील अपंग व्यक्तींना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी हा विकलांग व्यक्ती असावा. (अपंगत्वाचे प्रमाण 40% किंवा त्यापेक्षा जास्त असावे)
- विद्यार्थी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून शिक्षण घेणारा असावा.
- विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा एखाद्या कारणास्तव त्याने अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास त्याला संबंधित शिष्यवृत्ती नाकारण्यात येईल.
- उच्च माध्यमिक / माध्यमिक / पदवी या क्रमाने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दोनदा किंवा दुसऱ्या वेळेला लागू होणार नाही. (अर्ज चढत्या क्रमाने असावा व एका वेळेला एकच अभ्यासक्रम लागू होईल)
- गट अ वगळता उमेदवारास शिष्यवृत्ती लागू होणार नाही.
- गट ब, क, ड, ई – विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास या योजनेसाठी तो / ती अपात्र ठरेल.
- गट अ : पहिल्या प्रयत्नात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला, तरीही या योजनेसाठी तो पात्र असेल. परंतु संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत दुसऱ्या वेळेला तो अनुत्तीर्ण झाला, तर या योजनेसाठी तो अपात्र ठरेल.
- या योजनेसह उमेदवार फक्त राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करू शकतात. इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- अर्जदार पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नोकरी करत असेल तर तो / ती या योजनेसाठी पात्र नाही.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचा रहिवाशी दाखला
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (फक्त गट अ साठी)
- अधिवास प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- पालक प्रमाणपत्र
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE) |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
| राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
| डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
शिष्यवृत्ती योजना
हेल्पलाईन
| हेल्पलाईन नंबर | 022-49150800 |
| मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री) | 1800 120 8040 |
| Telegram Group | Join |
| Helpline Number | 022-49150800 |
| CM Helpline Number (Toll Free) | 1800 120 8040 |
| Mahadbt Scholarship Home Page | Click Here |
सारांश
आम्ही अपंग व्यक्तींसाठी सुरु करण्यात आलेल्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. [Post-Matric Scholarship For Persons With Disabilities]