savitribai phule scholarship Maharashtra: शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुणे विद्यापीठाने महाविद्यालये/ विद्यापीठ विभागामध्ये अव्यवसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनींसाठी “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना” सुरू केलेली आहे.
शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थीनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून विद्यापीठाकडून सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत सोबत जोडलेल्या नियम व अटीनुसार अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनीस गुणानुक्रमे 5000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. [savitribai phule scholarship Maharashtra]
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना चे उद्दिष्ट्य
- विद्यार्थ्यांनींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे.
- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- मुलींमध्ये शिक्षणासाठी ओढ निर्माण करणे.

उपरोक्त अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
- वरील शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी मार्च पर्यंत ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज करावा.
- महाविद्यालय / विद्यापीठ विभागाने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने भरलेल्या अजांची छाननी करून आपल्या महाविद्यालयाच्या PUNCODE वरून दि. मार्च पर्यंत Online पद्धतीने विद्यापीठास सादर करावी. [savitribai phule scholarship Maharashtra]
Savitribai Phule Scholarship Maharashtra अंतर्गत महत्वाच्या सूचना
- विहित केलेल्या नियमानुसार विद्यार्थी दोन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र असल्याने एका पेक्षा जास्त शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असल्यास एकाचवेळी अर्जातील योग्य ते दोन पर्याय निवडता येईल.
- विद्याथ्र्यांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने सादर केलेले अर्जातील माहिती संबंधित महाविद्यालय / विद्यापीठ विभाग यांनी काटेकोरपणे छाननी करून ऑनलाईन (Online) पध्दतीने विद्यापीठास विहित मुदतीत सादर करावी.
- विद्यापीठ विभाग / महाविद्यालयाकडून विद्याथ्यांचे अर्ज (Hard Copy) स्वीकारले जाणार नाहीत.
- महाविद्यालय / विद्यापीठ विभाग यांनी विद्यार्थ्यांनी भरलेले अर्ज तपासुन अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरीत ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाकडे सादर करण्याची प्रक्रिया करावी.
- बँकांचे विलनीकरण झाल्यामुळे ज्या बॅकांची खाती नव्या बँकेत विलीन झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा करण्यास अडचणी येतात. सबब विद्यार्थ्यांनी या संदर्भात चालू खाते (Current Account) व नव्याने असणारे खाते क्र. (Account No.), बॅकेचे नाव (Bank Name) व IFSC Code इ. माहिती विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरताना अचुक व काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
- अव्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना उपरोक्त शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विहित नियम व अटी विचारात घेऊन माहिती वर उल्लेख केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या अधिकृत पोर्टल वरून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज करावेत.
- ऑफलाईन (Offline) अर्जाचा शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याची संबंधित विभागाने / महाविद्यालयाने व विद्यार्थ्याने नोंद घ्यावी.
- उपरोक्त शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत.
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजना लागू राहणार नाही.
- विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण व A.T.K.T असलेल्या विद्याथ्यांनी अर्ज करू नयेत.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना फक्त मुलीसाठी असून मुलांनी अर्ज करू नयेत.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
- वरील शिष्यवृत्ती / अर्थसहाय्य योजनेचा फायदा विद्यार्थ्यास संपूर्ण पदवी काळात एकदाच आणि पदव्युत्तर काळात एकदा दिला जात असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये किंवा त्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करू नयेत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईंट चा उल्लेख न करता टक्केवारी मध्ये उल्लेख करावा.
- विद्यार्थ्यांनी (Online) माहिती भरताना अचुक व परिपूर्ण भरावी.
- विद्यार्थ्याचे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे.
- विद्यार्थ्यांनी बँकेची माहिती भरताना स्वतःचे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमुद करावी. पालकांची अथवा इतर व्यक्तीचा बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
- ऑनलाईन (Online) अर्जासोबत विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे अर्जासोबत Upload करावीत इतर कोणतेही कागदपत्रे Upload करू नये. [savitribai phule scholarship Maharashtra]
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना पात्रता व अटी
- महाविद्यालये/ विद्यापीठ शैक्षणिक विभागातील अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त 10 व अव्यवसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जास्तीत जास्त 5 विद्यार्थीनी सदर योजनेसाठी पात्र राहतील.
- पात्र विद्यार्थीनीस 5000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल,
- विद्यार्थीनींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे यासाठी संबंधित तहसिलदाराचा दाखला आवश्यक राहील.
- सदरचे अर्थसहाय्य पात्र विद्यार्थिनीस संपूर्ण पदवी आणि पदव्युत्तर काळात एकदाच देण्यात येईल.
- विद्यार्थिनीने मागील लगतच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण संपादित केलेले असावेत.
- 50 टक्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थीनींचा गुणानुक्रमे विचार करण्यात येईल.
- महाविद्यालये/ विद्यापीठ शैक्षणिक विभागामध्ये विद्यार्थीनीने नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थीनीने व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा.
- विद्यार्थीनीची नियमित अभ्यासक्रमात किमान 75 टक्के उपस्थिती असणे आवश्यक राहील. या संदर्भात प्राचार्यांनी दाखला देणे आवश्यक राहील.
- विद्यार्थीनीस या योजनेच्या कालावधीत कोणतीही पगारी नोकरी स्विकारता येणार नाही.
- विद्यार्थीनीस गैरशिस्त / नैतिकता / परीक्षेतील गैरप्रकार इ. बाबत शिक्षा झालेली नसावी.
- अर्थसहाय्यासाठी विद्यार्थीनीच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर इतर उपक्रमातील सहभाग उदा. क्रीडा, समाजसेवा, कला इ. विचारात घेण्यात येईल.
- विद्यार्थीनीने त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे. उदा. बँकेचे नाव, पत्ता, खाते क्रमांक (एमआयसीआर कोड आणि आयएफएससी कोड)
- शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही. याबाबत संबंधित विद्यार्थीनीने आणि प्राचार्यांनी एकत्रित हमीपत्र भरून देणे आवश्यक राहील. [savitribai phule scholarship Maharashtra]
ऑनलाईन अर्जासोबत अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे
- विद्याथ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
- वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला.
- जातीचा दाखला
- राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खात्याच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
- ई-मेल आयडी
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- पुरग्रस्त/दुष्काळग्रस्त/आपत्तीग्रस्त विभागप्रमुख/प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शपथ पत्र
- सदर योजनांतर्गत शैक्षणिक वर्ष 2024 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय / विद्यापीठ विभाग यांच्यामार्फत ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
पहिला टप्पा:
- अर्जदार विद्यार्थिनीस सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर New User वर क्लिक करून Login Id आणि Password तयार करावा लागेल.
दुसरा टप्पा:
आता तुम्हाला तुमच्या Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला Apply For scholarship बटनावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Submit बटनावर क्लिक करायचे आहे.



अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [savitribai phule scholarship Maharashtra]
Telegram Group | Join |
Savitribai Phule Scholarship Maharashtra Portal | Click Here |
सारांश
आम्ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ची सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे त्यामुळे तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचा व या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवा. तसेच तुमच्या परिसरात जे कोणी विद्यार्थिनी असतील तर त्यांना या योजनेची माहिती आवश्यक द्या जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला आमच्या ई-मेल आयडी वर संपर्क साधा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
इतर शिष्यवृत्ती
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
आदिवासी विकास विभाग
उच्च शिक्षण संचालनालय
तंत्र शिक्षण संचालनालय
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (DTE) |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
अल्पसंख्याक विकास विभाग
कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना |
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना |
शिष्यवृत्ती योजना
हेल्पलाईन
हेल्पलाईन नंबर | 022-49150800 |
मुख्यमंत्री हेल्पलाईन (टोल फ्री) | 1800 120 8040 |